पृष्ठे

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

सर्वांगीण विकासासाठी ‘मूल-पालक-गुरु’ यांचे आंतरवैयक्तिक संबंध – आज व असे !


‘‘वरी चांगला अंतरी गोड नाही | तया मानवाचे जीणे व्यर्थ पाही ||

वरी चांगला अंतरी गोड आहे | तयालागी कोणीतरी शोधिताहे ||’’

ज्याअर्थी मी तुम्हाला शोधत येथे आलो त्याअर्थी तुम्ही वरून चांगले व आतून गोड आहात किंवा ज्याअर्थी तुम्ही मला शोधत होता त्याअर्थी मी वरून चांगला व आतून गोड आहे हे सिद्ध होते. अशा चांगल्या व गोड माणसाला आपण का बरं शोधत असतो ? कारण माणूस हा समाजशील व उत्सवप्रिय प्राणी आहे. एकत्र येणे ही त्याची गरज आहे. कळपाने एकत्र येणे इतर प्राणी ही करतातच की मग त्यात माणसाचं वेगळपण ते काय?

माणूस एकत्र का येतो व त्यानं कसे एकत्र यावं हे पुढील सहा आधारावर सांगता येईल –

१] समान मत/ विचार/ दृष्टिकोण/ उद्देश/ यांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र यायचे.

२] समान नियम/ विधि/ आचार यांच्या आधारावर संबंध कायम करण्यासाठी एकत्र यायचे.

३] समतोल, समरूप, शांत, सुस्वर सहजीवनासाठी एकत्र यायचे.

४] कलह टाळण्यासाठी एकत्र यायचे.

५] सुस्वर सहजीवनाने अंतर्गत शांती व आनंदाची अनुभूती घेण्यासाठी एकत्र यायचे.

६] फायद्यांचा समान वितरणाने अधिक फायदे मिळविण्यासाठी एकत्र यायचे.

या अशा सहा आधारावर आपण एकत्र आलो की निश्चितच काही तरी भरीव निर्माण होतं. हे जे काही भरीव असतं ते सर्वांच्याच फायद्याचं, विकासाचं असतं. किमान त्याला पोषक तरी असतंच. मग हे कोणाकोणाच्या फायद्याचं असतं ते जरा पाहू या.

१] मूल – मानवी वंश सातत्याचं अजाण, अबोध, सुंदर असं चेतनगत अस्तित्व.

२] पालक – असा पूर्वज [ आधी जन्मलेला] जो आपलं भौतिक व आधिभौतिक सातत्य निर्माण करून त्याचं प्रेमळपणे पालनपोषण करतो.

] आई - वडिल = शारीर व सांस्कृतिक सातत्य निर्माण करतात

] पालक = मोठा भाऊ, नातलग, दत्तक पालक, महापुरुष इ. मूल्य किंवा सांस्कृतिक सातत्य निर्माण करतात.
उदा. ज्ञानेश्वर, छ. शिवाजी इ. महाराष्ट्राचे पालकच – समता, स्वातंत्र्याची ओढ,पराक्रमाची आस इ.मूल्ये यांनी दिली. गांधीनी आजच्या भारताला दिशा दिली तर आंबेडकरांनी एक सुदृढ रचना दिली.  एखादा सरपंच गावाला विकसित करतो व गावाचं पालकत्व स्वीकारतो.

३] गुरु – असं गुणाढय ऋजुत्व जे स्वत:च्या उदाहरणातून सूचना, माहितीच्या द्वारे जीवन जगण्याचा मार्ग दाखवते कधी प्रेमाने तर कधी कानउघाडणीने.

४] शिक्षण- सुसंस्कृत,इष्ट मानवी वर्तनासाठी सुव्यवस्थित माहितीच्या माध्यमातून बौद्धिक व नैतिक शिक्षण देणे. 

५] शिक्षित व्यक्ति – शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मीय क्षमतांचा समतोल, आनंदपूर्ण विकास होवून वर्तनात झालेला इष्ट बदल.

या पाचांसाठी आपण सतत काही काही विचार करत असतो कधी एकट्याने तर कधी समूहाने.
      
आपण एकत्र येतो व विकासपूरक असं काही चिंतन करतो. कोणासाठी ? तर मूल – पालक – गुरु यांच्यासाठी. पण मग फ़क्त यांच्याचसाठी का ? या तीन शिवाय अजून एखादी मिति राहत तर नाही ना ?  ती चौथी मिति म्हणजे आपण ज्या या परिसरात राहतो तो परिसर, समाज !

जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत | म्हणून तर आपण दगड धोंडयातही देव पाहतो. पंचमहाभूते म्हणून आपण या परिसराचा गौरव ही केला आहे. आपण आणि आपला परिसर यांचे एक नातं असतं. हे संबंध सहजा- सहजी सुटत नाहीत.

एक एक करून आपण बाजूला झालो तरी कोणत्याही दोन व्यक्तीतील संबंधांमुळे विश्वाचं हे जाळं टिकते.  कोणत्याही दोन घटकांमध्ये काही न काही संबंध असतात.

मग हे संबंध म्हणजे काय व ते कसे असतात ?  

संबंध म्हणजे विशेष बंध.  हे बंध चांगले – वाईट, प्रेमळ – घृणास्पद, मूर्त – अमूर्त, स्वीकृत – लादलेले, पूरक – मारक, सुखद – जाचक, दृश्य – अदृश्य, इष्ट – अनिष्ट, एकल – बहुल, एकेरी – दुहेरी - बहुपेडी, अल्पकालिक – दीर्घकालीन, तात्कालिक – क्रांतिक असे विविधांगी असतात.

हे असे वैविध्यपूर्ण संबंध निसर्गदत्त असतात. मुलाच्या जन्माने निर्माण होणारे नातेसंबंध आई, बाबा, काका, मामा, आजी, आजोबा इ. तर लग्नाने निर्माण होणारे काही नातेवाईक इ. कधी टाळता येणारे तर कधी न टाळता येणारे. अनिवार्य असतात. ते आहेत तसे स्वीकारून जगत राहणे ही प्रकृति हा सामान्य प्राणीस्तर. तर असलेले आंतरवैयक्तिक संबंध परस्परांच्या विकासासाठी वापरणे, वृद्धिंगत करणे ही संस्कृति, हा मानवी स्तर !

माणसांमध्ये संबंध असतात व ते विकासपुरक होवू शकतात. 

मग हा विकास म्हणजे काय ?

विस्तार, फैलाव म्हणजे वाढ. वाढ एकांगी असते. तिचा विकृत स्तर म्हणजे सूज तर सुकृत स्तर म्हणजे विकास. विकास बहु अंगी, सर्वांगीण असतो. हा विकास कशा-कशाचा व कोणा-कोणाचा ? फक्त मानवाचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास का ? मानवाचा गरजांची अमर्याद पूर्तता म्हणजे विकास का ?
आता बघू या सर्वांगीण विकासात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते.
                       
                          
                               सर्वांगीण विकास
         ---------------------------------------------------------------------------
       सजीव                                              निर्जीव
स्व च्या जाणीवेचा चढता स्तर                              पर्यावरण/ परिसर
----------------------------------------------------------------------   १] भूमी  ३] वायू      
                                                   २] पाणी  ४] अवकाश
वनस्पति               प्राणी                 मानव      
                                  ---------------------------- 
                            वैयक्तिक              सामूहिक
                                             -----------------------
                                           संस्थागत       सामाजिक
                           १] शारीरिक     १] कुटुम्ब     १] आर्थिक स्थैर्य
                           २] बौद्धिक       २]परिसर     २] सामाजिक प्रतिष्ठा
                           ३] मानसिक     अ] शेजार-पाजार 
                           ४] आत्मीय      ब] नातलग               
                                          क] कार्यस्थल 

या सर्वांचे परस्परांशी संबंध असतात व ते सुखमय व्हावेत यासाठी मानवाने हेतुत: प्रयत्न करावे लागतात. हे असे प्रयत्न म्हणजे मानवाने मानवासाठी मानवाद्वारे केलेला विकास, सर्वांगीण विकास असतो.
स्व ची ओळख, जगण्याचा अर्थ आणि अस्तित्वामागची कारणपरंपरा जाणून घेणं म्हणजे समन्वित विकास.
शारीरिक वाढ हा दृश्य विकास तर शारीरिक बलाचा योग्य वापर हा मूल्यात्मक विकास, संस्कृतिजन्य विकास.

विकास म्हणजे इष्ट बदल. मानवाचा विकास म्हणजे मानवी वर्तनातला इष्ट बदल. इष्ट बदल करण्यापूर्वी अनिष्ट वर्तन ओळखायला हवे. इष्ट-अनिष्ट बदल ओळखून इष्ट असा बदल कसा करावा हे सांगणारा पथदर्शक म्हणजे शिक्षण.

जे वैज्ञानिक व प्रासंगिक नाही ते अनिष्ट होय.

अजाणता झालेले किंवा केलेले अनिष्ट वर्तन म्हणजे विकार/ रोग होय.

जाणून बुजुन होणाऱ्या, केल्या जाणाऱ्या सवयी अनिष्ट वर्तन -
१] शारीरिक – नको ते नको तसे नको तेव्हा खाणे, पिणे, उठणे बसणे, झोपणे इ .
२] बौद्धिक – चोरी करणे, खोटे बोलणे इ.
३] मानसिक – आळस
४] आत्मीय – निंदानालस्ती करणे इ.

प्लेटोने अडीच हजार वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण केले होते. जर तुम्हाला अदृश्य व्हायची शक्ती मिळाली तर तुम्ही नैतिक रहाल का ? असा प्रश्न विचारला. एकानेही होय असं उत्तर दिलं नाही. आजही या प्रश्नाचं होय असं उत्तर मिळण अवघड वाटतेय.

हे असं अनिष्ट वर्तन येतं कुठून ? माणसाला शिव्या कोण शिकवतं ? काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी एकमेकाला म्हटल होतं - मी तुम्हाला कोणत्याही पुस्तकात नसतील अशा शिव्या देईन. मी तुम्हाला कोणत्याही शाळेत, कॉलेजात शिकवल्या जात नाहीत अशा शिव्या देऊ शकतो. मानवाच्या आजवरच्या इतिहासात शिव्या शिकविणारी शाळा अस्तित्वात नाही. तरीही जवळ जवळ सर्व स्त्री पुरुषांना शिव्या माहित असतात. आपण हे असं अनिष्ट वर्तन समाज नावाच्या शाळेत शिकतो.

माणूस हा अनुकरणप्रिय आहे म्हणून चांगल्या व वाईट सवयी बहुधा अनुकरणातून येतात. अनिष्ट वर्तन अंतिमत: विघातकच आहे म्हणून हे अनिष्ट वर्तन जेथून सुरुवात होते तेथूनच त्याला बदलावे लागेल. म्हणून आता एक अनिष्ट वर्तन सूची तयार करू.

       
अनिष्ट वर्तन – बोध, शोध आणि निर्मूलन कृती प्रतिमान


अ.
क्र.



अनिष्ट वर्तन/
अयोग्य सवय

सवयीचे निर्मिती स्थान/
स्त्रोत  

सवयीचे कारण
तत्व / व्यक्ति

बदलाचा सोपा उपाय
अल्पकालिक/ दीर्घकालिक

१]

परीक्षेत कॉपी करणे
१]घर, २] शाळा, ३] समाज/ परिसर 
१] अनुकरण हा मानवी स्वभाव
२]मुलाला घरी, शाळेत अनुवर्तन शिकवले जाते. म्हण बा बा, पा पा, [घर] पुस्तकातील शुद्धलेखन गृहपाठ [शाळा]
१] परीक्षेपूर्वीचे व परीक्षेतील अनुकरण यातला फरक समजला पाहिजे.२] परीक्षा वा
मूल्यमापनामागील अर्थ, त्याची गरज, त्याचे फायदे मुलांना समजावले पाहिजेत.

२]


शिव्या देणे.
१] परिसर- बाजार, पाणवठा,जत्रा, बस स्थानक इ.
१] भावनांचा विस्फोट [Spontaneous overflow of Emotions ] म्हणजे केवलप्रयोगी अव्यय, काव्य व शिव्या.
2] एक भावनिक गरज – राग, ताणतणावांचा निचरा होतो.
३]मनोरंजन,विनोद निर्मिती, बोलण्याची ढब- पालुपद/ तकिया कलम इ. अभिव्यक्तीचे साधन 
१]जाणीवपूर्वक प्रत्येकाने स्वत:वर लक्ष ठेवायला हवे. २] स्वत:च्या मुलासमोर आपण शिव्या देत नाही तसे दुसऱ्याच्याही मुलासमोर अपशब्द बोलू नयेत. ३] आपल्या क्रोधावर नियंत्रण व दुसऱ्यांच्या चुकांना क्षमा करण्याची मानसिकता वाढवणे. ४] ताणतणावांचा योग्य निचरा करणारे खेळ वा अन्य पद्धती वापरणे इ.इ.  








याप्रकारे आपण आपल्या व मुलांच्या अनिष्ट वर्तनांना इष्ट वर्तनात बदलू शकतो. हे असे अनिष्ट वर्तन आपण सारे मिळून निर्माण करत असतो, पसरवत असतो. अनिष्ट वर्तनांची/ मानवी समस्यांची अमर्याद संख्या पाहता त्या प्रत्येकाचा मूलस्त्रोत व त्यावर एक रामबाण उपाय शोधायला हवा.
खालील उदाहरणाकडे पहा.
]   1+1 = 1
ब] +2 +2 = ∞[अमर्याद]  
क] – 2 -2  = 0
वरील पैकी कोणते गणित बरोबर आहे ?

शाळेतल्या गणित शास्त्राने तिन्ही उदाहरणे चूक आहेत पण जीवनशास्त्रात सारी बरोबर आहेत.

आई व बाबा मिळून एकच पालक तयार होतात. मुलांसाठी ती दोन नसतात.


आई - बाबा खुश असतील किंवा घर व शाळेत आनंदी वातावरण असेल तर मुलाची खुशी अमर्याद असते.

घरात आई वडिल व शाळेत शिक्षक आणि मित्रांकडून मानसिक आधार न मिळाला तर मुलांना सारं जग, आपल आयुष्य शून्य वाटतं. मग ते भलत्याच दिशेला जातात.


मूल - म्हणजे आपलं भविष्य - सुंदर, सुखरूप हवे असेल तर पालक व गुरु हे त्याचे दोन चाकं योग्य विचाराने आचाराने चालायला हवे. त्यासाठी योग्य दिशा हवी. अशी दिशा, असा एक राजमार्ग - जो अंतत: सर्वांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असेल – आपण शोधायला हवा किंवा निर्माण करायला हवा.
समजा की आपण एका मोठ्या महालात बंद आहोत. ज्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक खोली आहे. आपल्या गरजा कितीही कमी केल्या तरी आपल्याला त्या चाव्यांचा जुगा कायम वागवावा लागेल. यातून सूटण्यासाठी आपण काय कराल ? एक मास्टर की/ गुरुकिल्ली शोधू किंवा तयार करू.
जगाच्या या दु:खमय समस्यांच्या बंदीशाळेतून सूटण्यासाठी आपणही आता अशी एखादी गुरुकिल्ली मिळते का ते पाहू. आपण परस्परांशी संबंधित आहोत म्हणून ही गुरुकिल्ली आपल्या पासून सुरु होते व आपल्यापाशीच थांबते.

कोण कुठे काय करू शकतो ? 

शिक्षकांनी शाळेत, पालकांनी घरी व मुलांनी घरी व शाळेत स्वत:चे दोन कृती आराखडे [Action Plans] तयार करावेत. 
अ] कायमस्वरूपी व दैनंदिन, ब] आपात्कालीन व तात्कालिक

                     आनंदाने प्राप्त करावयाची उद्दिष्टे


कालावधी
वर्ग
शाळा
घर –
आई-वडिल  
घर –
मूले
परिसर/
समाज
वैयक्तिक
स्वत:
वैयक्तिक
पति/ पत्नी

१ महिना







१]रोज अर्धा
तास सोबत घालवणे.
अभ्यासा
शिवाय.



३ महीने






१] एक
दिवसाची
घरगुती
सहल.




६ महीने




१] इष्ट
वर्तन बदल
परीक्षण






१ वर्ष





शालेय गरजांची
पूर्तता करणे


१] एक झाड लावणे.


३ वर्ष








१]अपशब्द
नाही
५ वर्ष






१]योग्य
देणगी


१० वर्ष





सद्सद्विवेक
बुद्धीची वाढ



जगण्याची
कला








१] एक सुजाण नागरिक



याप्रकारे प्रत्येकाने स्वत:ची अशी एक गुरुकिल्ली तयार करायला हवी.
पूर्वीच अस्तित्वात असलेली व शोधातातच सापडलेली माझी आवडती गुरुकिल्ली – 

 अंतरी निर्मळ | वाणीचा रसाळ | त्याचे गळा माळ | असो नसो ||

आपले अंतस शुद्ध आहेच त्यावर फक्त मळ बसलाय नकोश्या संस्कारांचा. अंतस निर्मल करण्यासाठी ध्यान, प्रेम, कर्म, ज्ञान, प्रार्थना, सेवा इ.इ. यापैकी एक किंवा सर्व मार्गांचा वापर करता येतो.

ध्यान म्हणजे  १] तणावरहित अवस्था, २] निर्णयरहित अवस्था, ३] जे जसे आहे त्याचा स्वीकार/ साक्षीभाव. अस्तित्वाचा सहज स्वीकार.

अजाणता आपली आई गीता जगत असते. कसे? गीतेत ३ मुख्य गोष्टी, मार्ग, तत्वे सांगितली आहेत.
ज्ञान, कर्म, भक्ति. मुलाला भूक लागल्याचं ज्ञान आईला त्याचा रडण्याने होते. ती त्याच्यासाठी जेवण बनवते हे झालं कर्म. ती हे सर्व प्रेमाने करते ही झाली भक्ति.

अंतस निर्मल असावे व वाणी रसाळ हवी. बाकी तुम्ही राजा असा की रंक त्याने काही फरक पडत नाही.

एकदा अंतस निर्मल होऊ लागले की सुंदर प्रभावी  विचार येतात असे विचार श्रेष्ठ आचार निर्माण करतात. रसाळ वाणी त्यांच्या प्रकटीकरणाचे प्रभावी माध्यम बनते.

आपल्या चर्चेचा सूर जगात काही चांगले नाहीच सारे काही वाईट आहेसा नाही. जगात चांगले आहे फक्त त्याच्यावर पुरेसा भर नाही. Focus नाही. कसे ते पहा.

All is fair in Love and War. याचा अर्थ आपण ‘ प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य / माफ आहे’ असं घेतो.  
तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून मी तुझ्या चेहऱ्यावर तेजाब टाकतो. एकतर्फी प्रेमवीर. रिंकू पाटील सारखी प्रकरणे आपल्या इथेच घडली ना !

‘तुम अगर मुझको न चाहोगी तो कोई बात नहीं ,

तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी |’

तुम अगर मेरी भी नहीं तो  पराई भी नहीं,

मेरे दिल को ना सराहो तो कोई बात नहीं,

गैर के दिल को सराहोगी तो मुश्किल होगी |’ 

अरे बाबा पण का ? प्रेमाची ही जबरदस्ती कशासाठी ? अतिरेकी प्रेमाचे असे सार्वकालिक अविष्कार एकूण मानवी समाजास घातकच आहेत. चेंगीझखान, औरंगजेब, हिटलर यांच्या युद्धातील अनन्वित अत्याचारांची परंपरा तर आजही चालू आहे. नुकतंच एका भारतीय सैनिकाचं शीर कापून फेकून देण्यात आले आहे.


आता या क्षम्य / मा ऐवजी शक्य असा विचार घेतला की हेच वाक्य कालजयी ठरते. 
हिरकणीचे आपल्या मूलावरचं प्रेम, दशरथ मांझीचं आपल्या बायकोवरचं प्रेम सारं काही शक्य बनवते. राणी रूपमती व बाज बहादुर, लैला मजनू इ. सर्व काही शक्य प्रेमाचे साक्षीदार.

अब्दुल हमीद असो की बाजी प्रभू युद्धात सारं काही शक्य बनवणारे हुतात्मे जगाला प्रेरणा देतात.

जगात खूप काही चांगले आहे. त्याच्यावर आपण पुरेसा भर देत नाही. हा भर देण्याचा विचार देणे हाच आपल्या एकत्र येण्याचा मूळ उद्देश आणि आजच्या आपल्या भेटीचे फलित.