पृष्ठे

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

नावाचे कृष्णविवर !

नावाचे गौडबंगाल ते नाम महिमा इतके नावाचे अस्तित्व सर्वव्यापी आहे. इतके की ` देव येवो अथवा जावो | मुखी नाम त्याचे राहो |' प्रत्यक्ष ईश्वराशी आम्हांला काही घेणे देणे नाही त्याचे नाम फक्त मुखात राहो. अशी नावाची महिमा आहे. त्यामुळे ब्लॉगच्या नावापासूनच सुरु केलेली चांगली !

`प्रबुद्ध कृष्ण '-  कृष्ण या नामाचे प्रबुद्ध हे विशेषण घेतले तर 'ज्ञानी कृष्ण' [महाभारतातील देवकीपुत्र ] असा सरळ अर्थ होतो. याशिवाय प्रबुद्ध, ज्ञानी काळेपण [कृष्ण = काळा] असा ही अर्थ करता येतो. कृष्ण=काळा हा काळा काहीही, कोणीही,कुठेही, कसाही,कितीही. अजून एक म्हणजे प्रबुद्ध,ज्ञानी चुंबक/ आकर्षून घेणारा [कर्षति इति कृष्ण:  या अर्थाने ]. विद्वानांनी जरूर अजून अर्थ शोधावेत.

लेखकास अपेक्षित असणारा अर्थ - प्रबुद्ध कृष्ण म्हणजे ज्याने वा जिने परिपूर्ण ज्ञानप्राप्ती केली आहे,ज्यांस बुद्धत्वाची आत्मिक अवस्था प्राप्त झाली आहे अशी आकर्षक चेतना. असा बुद्ध जो कृष्णमय आहे वा असा कृष्ण जो समबुद्ध,संबुद्ध आहे.

या  नावाचे अनेक अर्थ, पदर हळू हळू उलगड जावू. हाच आपल्या संवाद प्रवासाचा आदी -मध्य- अंत असेल.

सुरुवातीसच  हे सुचवून ठेवतो की हा ब्लॉग प्रबुद्ध नावामुळे ना बौद्ध धर्माशी संबंधित आहे ना कृष्ण नावामुळे हिंदू धर्म,तत्वज्ञानाशी जवळीक सांगणारा आहे. तसेच भाषा गंभीर/अवघड  वाटली तरी आमचा तथाकथित अध्यात्म, कर्मकांडास दुरूनच नमस्कार आहे.

आपण माणूस आहोत ही बाब सार्वलौकिक आहे, आपण वर्तमानात जगतो ही बाब सार्वकालिक आहे, मानवाचे मूळ रूप आनंददायी आहे ही बाब सार्वभौमिक आहे या ब्लॉगवर माणसाच्या वर्तमानातल्या आनंदाची वाढ करण्याचा एक लेखीय प्रयत्न केला जाईल.

आनंदाची जोपासना व वाढ होत राहो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा